नागपूर-धुळे बसने अचानक पेट घेतला !
चालकाच्या प्रसंगावधानाने १६ प्रवासी बचावले !
नागपूर – जिल्ह्यातील कोंढाळी बसस्थानकाजवळ ‘एस्.टी.’ला आग लागली. सुदैवाने वेळीच चालक आणि वाहक यांनी आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. ही एस्.टी. नागपूर मध्यवर्ती बसस्थानकावरून पहाटे ५.३० वाजता १६ प्रवाशांना घेऊन धुळे येथे जात होती. कोंढाळी बसस्थानकावर ७.३० वाजता एस्.टी. आल्यानंतर तिच्या इंजिनमधून धूर निघून इंजिनने पेट घेतला. ही गोष्ट चालकाच्या लक्षात येताच त्याने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. अग्नीशमनदलाने आग विझवली.