६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलोचना जाधवआजी यांना रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती !
देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुलोचना जाधवआजी (वय ७७ वर्षे) यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर आलेल्या अनुभूती !
१. रुग्णाईत असल्यामुळे जेवण न जाणे, थकवा येणे आणि रामनाथी आश्रमात गेल्यावर जेवण नीट जाणे
‘वर्ष २०२२ मध्ये मी ६ मास रुग्णाईत होते. माझी पोटाची २ शस्त्रकर्मे झाली होती. तेव्हापासून मला चतकोर भाकरी, एक चमचा भात आणि अर्धा वाटी वरण, एवढे जेवण्यासाठी एक घंटा लागायचा. त्यानंतर ‘कधी एकदा जाऊन झोपू’, असे मला व्हायचे. मी खाली बसले, तर मला उठता येत नव्हते.
मार्च २०२३ मध्ये मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा मला परात्पर गुरुदेवांच्या कृपेने प्रतिदिन एक भाकरी, एक वाटी वरण आणि एक चमचा भाजी खाणे शक्य झाले. मी संध्याकाळीही तेवढाच महाप्रसाद घेऊ लागले. मला पुष्कळ आनंद झाला.
२. मी रामनाथी आश्रमात गेल्यावर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्हा मला आनंद झाला.
३. रामनाथी आश्रमातून देवद आश्रमात परत येतांना तेथील सर्व साधक मला म्हणाले, ‘‘तुम्हाला गुरुदेवांनी पुष्कळ शक्ती आणि शांती दिली.’’
प.पू. गुरुदेवांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’
– सौ. सुलोचना जाधव (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.४.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |