नांदेड येथे बस पेटवल्याने अंतर्गत बससेवा बंद !
प्रवाशांचे हाल !
नांदेड – मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी येथे तीव्र स्वरूपात आंदोलन केले जात आहे. येथे एक एस्.टी. बस जाळण्यात आली असून दुसर्या बसवर दगडफेक करण्यात आली. या घटना मागील २ दिवसांतील असल्याने १४ सप्टेंबर या दिवशी नांदेड जिल्ह्यात जिल्हाअंतर्गत एस्.टी. बस सेवा सकाळपासून बंद ठेवण्यात आली. इतर आगार आणि विभाग येथून ज्या गाड्या रात्री मुक्कामी आल्या होत्या, त्यांना सकाळी सोडण्यात आले आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल झाले. बस जाळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.