पावसाळ्यात पायांच्या बोटांच्या बेचक्यांत होणार्या त्वचा विकाराचा प्रतिबंधात्मक उपाय !
‘पावसाळ्याच्या कालावधीमध्ये पायांच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये पाण्याचा अंश राहून तेथील नाजूक त्वचेला बुरशीजन्य विकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यावर अनेकदा वेगवेगळे मलम, पावडर इत्यादी लावले जातात. या बुरशीजन्य विकारासाठी प्रतिबंधात्मक उपाय, म्हणजे प्रतिदिन रात्री झोपतांना तळपाय, तसेच पायांच्या बोटांच्या बेचक्यांमधील नाजूक त्वचा स्वच्छ पुसावी. त्या भागाला हळदीचा धूर किंवा धूप देऊन त्वचा कोरडी करावी. त्यानंतर मोजे घालून झोपावे.
असे केल्याने रात्रभर ही त्वचा कोरडी राहून तिथे बुरशीची वाढ होणार नाही. त्यामुळे हा छोटासा उपाय अवश्य करा आणि अनेक प्रकारच्या औषधांविना निरोगी रहा !’
(५.७.२०२३)
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी.
(संपर्क इ-मेल : drsameerparanjape@gmail.com)