हिंदुस्थान पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचण्यासाठीचा मार्ग !
श्रीकृष्णाने दाखवलेल्या राजकारणी कौशल्याचा राष्ट्रीय हितासाठी उपयोग करून घेणे आवश्यक आहे. जर त्याला आदर्श म्हणून विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, संप्रदाय आणि पक्षाचे नेते यांनी, विशेषतः तरुणांनी आपल्यापुढे ठेवले अन् त्या दृष्टीने प्रामाणिकपणे प्रयत्न होऊ लागले, तर तत्त्वज्ञान, नैसर्गिक साधनांची अनुकूलता अद्यापही टिकून राहिलेले संस्कृतीचे वैशिष्ट्य, समाजधारणेसाठी सर्व दृष्टीने उपयुक्त असलेले नीतीनियम, आचार-विचार यांनी मुळातच संपन्न असलेला आपला हिंदुस्थान पुन्हा वैभवाच्या शिखरावर पोचण्यास विलंब लागणार नाही.
– ब्रह्मीभूत स्वामी वरदानंद भारती