कळवा येथे विद्यार्थिनीचा विनयभंग करणार्या शिक्षकाविरोधात गुन्हा नोंद !
ठाणे, १४ सप्टेंबर (वार्ता.) – कळवा येथील एका शाळेतील इयत्ता दहावीत शिकणार्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक योगेश अहिरे (वय ४८ वर्षे) यांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे. अहिरे हे चित्रकला विषय शिकवतात. ९ सप्टेंबरला पीडित मुलगी शिक्षक कक्षात गेली असता योगेश अहिरे यांनी तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने घडलेला प्रकार मैत्रिणी, मुख्याध्यापक आणि पालक यांना सांगितला. मुलीच्या वडिलांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर जाधव यांनी कार्यकर्त्यांसह शाळेत येऊन अहिरे आणि मुख्याध्यापक यांना खडसावले. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (असे वासनांध शिक्षक असणार्या शाळांवर सरकारने बंदीच आणायला हवी ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य काय घडवणार ? |