घरगुती साठ्यात ठेवायची होमिओपॅथी औषधे

‘घरच्‍या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ (लेखांक ६)

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्‍या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्‍यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

८ सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘होमिओपॅथी औषध किती दिवस घ्‍यायचे ?, आजार बरा झाल्‍यानंतर शिल्लक राहिलेल्‍या औषधाचे काय करायचे ?, होमिओपॅथी औषध चुकून अधिक प्रमाणात घेतले गेल्‍यास काय करावे ?, अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असल्‍यास काय करावे ? आणि घरगुती वापरासाठी होमिओपॅथी औषधांचा साठा ठेवायची आवश्‍यकता का आहे ?’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

डॉ. अजित भरमगुडे

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/718060.html

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

७ आ. घरगुती वापरासाठी कोणती औषधे किती प्रमाणात ठेवावी ? : घरगुती वापरासाठी होमिओपॅथी औषधे ‘एस्.बी.एल्’, ‘अ‍ॅलन’ (Allen), भार्गव, भंडारी इत्‍यादी अशा प्रस्‍थापित आस्‍थापनांनी बनवलेली घ्‍यावीत. आपल्‍या साठ्यात प्रत्‍येकी ३० ‘पोटन्‍सी’ची (शक्‍तीची) आणि १५ मि.ली. प्रमाणात किमान पुढील औषधे ठेवू शकतो. औषधे त्‍यांच्‍या इंग्रजी नावांच्‍या आद्याक्षरांनुसार क्रमानेदिली आहेत.

१. अ‍ॅकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)

२. एलियम सेपा (Allium Cepa)

३. एलो सोकोट्रिना (Aloe Socotrina)

४. अँटिमोनियम क्रूडम् (Antimonium Crudum)

५. आर्निका मोन्‍टाना (Arnica Montana)

६. आर्सेनिकम् आल्‍बम् (Arsenicum Album)

७. बेलाडोना (Belladona)

८. ब्रायोनिया अल्‍बा (Bryonia Alba)

९. कल्‍केरिया फॉस्‍फोरिकम् (Calcarea Phosphoricum)

१०. कॅलेंडुला ऑफिसिनॅलिस (Calendula Officinalis)

११. कॅन्‍थरिस व्‍हेसिकाटोरिया (Cantharis Vesicatoria)

१२. कार्बो व्‍हेजिटॅबिलिस (Carbo Vegetabilis)

१३. चायना ऑफिसिनॅलिस (China Officinalis)

१४. कोलोसिंथिस (Colocynthis)

१५. ड्रॉसेरा रोटंडिफोलिया (Drosera Rotundifolia)

१६. युपॅटोरियम पर्फोलियेटम् (Eupatorium Perfoliatum)

१७. जल्‍सेमियम सेम्‍पर्विरेन्‍स (Gelsemium Sempervirens)

१८. ग्रॅफायटीस (Graphites)

१९. हेपार सल्‍फुरिस कॅल्‍करिया (Hepar Sulphuris Calcarea)

२०. इपिकॅकुआन्‍हा (Ipecacuanha)

२१. लेडम् पालुस्रे (Ledum Palustre)

२२. लायकोपोडियम क्‍लॅव्‍हॅटम् (Lycopodium Clavatum)

२३. मर्क्‍युरियस सॉल्‍युबिलिस (Mercurius Solubilis)

२४. नक्‍स व्‍हॉमिका (Nux Vomica)

२५. फॉस्‍फोरस (Phosphorus)

२६. पोडोफायलम् पेल्‍टाटम् (Podophyllum Peltatum)

२७. पल्‍सेटिला निग्रिकन्‍स (Pulsatilla Nigricans)

२८. र्‍हस टॉक्‍सिकोडेंड्रॉन (Rhus Toxicodendron)

२९. रूटा ग्रॅव्‍हिओलेन्‍स (Ruta Graveolens)

३०. सेपिया ऑफिसिनॅलिस (Sepia Officinalis)

३१. सल्‍फर (Sulphur)

३२. सिंफायटम् ऑफिसिनॅलिस (Symphytum Officinalis)

३३. अर्टिका युरेन्‍स (Urtica Urens)

७ इ. औषधाचा साठा कसा ठेवायचा ? : होमिओपॅथी औषधे ठेवण्‍यासाठी बाजूला चित्रांत दाखवल्‍याप्रमाणे विशिष्‍ट प्रकारचे, विविध आकाराचे सागवान लाकडाची पेटी मिळते. आजकाल खाचा असलेल्‍या पिशव्‍याही (पाऊचही) उपलब्‍ध आहेत. पेटी आणि पिशव्‍या होमिओपॅथी औषधे मिळणार्‍या औषधांच्‍या मोठ्या दुकानात उपलब्‍ध असतात.

हे खोके किंवा पिशव्‍या यांमध्‍ये एकाच वेळी ४०, ६०, ८०, १२० याप्रमाणे बाटल्‍या बसू शकतात आणि प्रवासात सुद्धा त्‍या समवेत नेता येतात. प्रत्‍येक बाटलीवर औषधाचे नाव असणे अनिवार्य आहे. होमिओपॅथी औषधे ‘अल्‍कोहॉल’ माध्‍यमात असल्‍याने त्‍यांचे बाष्‍पीभवन होण्‍याचे प्रमाण अधिक असते. त्‍यामुळेच ही औषधे थंड ठिकाणी आणि सूर्यप्रकाशापासून दूर ठेवणे आवश्‍यक असते. फवारे (स्‍प्रे), कीटकनाशके, आधुनिक औषधे आणि कापूर यांपासून होमिओपॅथिक औषधे दूर ठेवावीत.

(क्रमश : पुढील शुक्रवारी)

आगामी ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. तरी स्‍वउपचार करण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक, वाचक, राष्‍ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत.