संभाजीनगर येथे मंत्रीमंडळासमोर ७३ आंदोलनांची आणि १८ जणांनी मागितली आत्मदहनाची अनुमती !
छत्रपती संभाजीनगर – राज्य मंत्रीमंडळाची विशेष बैठक १६ सप्टेंबर या दिवशी, तसेच १७ सप्टेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शहरात कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर २ दिवसांत ७३ आंदोलनांची अनुमती प्रशासनाकडे मागण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक १८ जणांचे आत्मदहनासाठी अर्ज आहेत. मोर्चासाठी ८, उपोषणासाठी ५, तर ३ अर्ज धरणे आंदोलनासाठी आले आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर आणि कायदा अन् सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे चालू असलेले उपोषण; त्यास पाठिंबा देण्यासाठी गावागावात चालू असलेले समर्थकांचे आंदोलन; आदर्श, मलकापूर, अजिंठा बँकेत अडकलेले पैसे परत मिळण्यासाठी गनिमी कावा; मुसलमान, ओबीसी आणि धनगर संघटनांची आरक्षणाची मागणी; मराठवाड्याच्या सिंचनाच्या अनुशेषाविषयाची अप्रसन्नता; दुष्काळ मागणीसाठी मोर्चा; नोकरभरती, पदोन्नती आणि इतर मागण्या यांसाठी शिक्षकांचा मोर्चा या आंदोलनासाठी पोलिसांकडे २९, जिल्हाधिकारी ३७, तर विभागीय आयुक्त यांच्याकडे ७ निवेदने आतापर्यंत प्राप्त झाली आहेत.
संपादकीय भूमिका
|