ठाणे येथील काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या शहर अध्यक्षासह ५ जणांविरोधात गुन्हा नोंद !
ठाणे, १३ सप्टेंबर (वार्ता.) – नेरूळ येथील एका नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून मध्यस्थांचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबियांकडून ४९ सहस्र ४८० रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष प्रथमेश यादव यांच्यासह अजित ओझा, पवनुमार मिश्रा, विनीत तिवारी आणि विष्णु घाडगे या ५ जणांच्या विरोधात कापूरबावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांचा भरणा असलेले राजकीय पक्ष जनतेला न्याय देतील का ? – संपादक)
मनोरमानगर येथे तक्रारदार जयेश पटेल हे रहातात. त्यांचे किराणा दुकान असून त्यांच्या ओळखीच्या एका मुलीला नेरूळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.