नांदगाव (जिल्हा नाशिक) येथे आरक्षणासाठी धनगर समाजाकडून आमरण उपोषण !
नाशिक – ओबीसींसह धनगर समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून अनेक ठिकाणी ‘आमरण उपोषण’ करण्यास त्यांनी प्रारंभ केला आहे. जिल्ह्यातील नांदगाव येथे धनगर समाजाच्या वतीने ‘आमरण उपोषण’ चालू झाले आहे. ‘जीव गेला तरी चालेल; पण आरक्षण मिळाल्याविना आंदोलन मागे घेणार नाही’, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.