कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कह्यात !
पुणे – धन्वन्तरी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या हस्तांतरणाच्या संदर्भात कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धन्वन्तरी महाविद्यालय आणि संशोधन विभाग यांचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख यांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. न्यायालयाने त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परिक्षीत नामपूरकर यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवली होती, तर महादेव देशमुख मार्च २०२२ पासून फसवणुकीच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत आहेत. सरकारी पक्षाच्या वतीने अधिवक्ता रेणुका देशपांडे कर्जतकर यांनी कामकाज पाहिले.