राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्वानाला वीरमरण !
राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथे २४ घंट्यांहून अधिक काळ जिहादी आतंकवाद्यांशी सुरक्षादलांची चकमक चालू आहे. आतापर्यंत या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत, तर सुरक्षादलाचे २ अधिकारी घायाळ झाले आहेत. या चकमकीच्या पूर्वी येथे शोधमोहीम चालू असतांना आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सैन्याचे श्वान केंट हिचा मृत्यू झाला.
#WATCH | Indian Army personnel pay last respects to Indian Army dog Kent, a six-year-old female labrador of the 21 Army Dog Unit. The canine soldier laid down her life while shielding its handler during the Rajouri encounter operation in J&K. Kent was leading a column of… pic.twitter.com/gAxkTusG33
— ANI (@ANI) September 13, 2023
श्वान केंट हिने तिच्या हँडलरला (प्राण्यांना प्रशिक्षित करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवणार्याला) वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलीदान दिल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. सैन्याकडून केंट हिला श्रद्धांजली वहाण्यात आली आहे. या संदर्भात सैन्याकडून केंट हिचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे.
#WATCH | Indian Army dog Kent, a six-year-old female labrador of the 21 Army Dog Unit laid down her life while shielding its handler during the ongoing Rajouri encounter operation in J&K. Kent was leading a column of soldiers on the trail of fleeing terrorists. It came down under… pic.twitter.com/ZQADe50sWK
— ANI (@ANI) September 13, 2023
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, केंट जंगलामध्ये लपलेल्या घुसखोरांचा माग घेत आहे. त्या वेळी तिच्या मागे सैनिक जात आहेत. त्या वेळी केंट एक झुडपाच्या ठिकाणी जाते. तेथे एक घुसखोर हात वर करून बाहेर आल्यावर केंट भुंकते आणि घुसखोरावर झडप घेते. त्यानंतर सैनिक या घुसखोरास घेरतात. त्यानंतर केेंट तिच्या नियंत्रकाजवळ परत येते.