तालिबानमधील गटबाजीमुळे अफगाणिस्तानची गृहयुद्धाकडे वाटचाल !

काबुल – अफगाणिस्तानचे माजी कमांडर लेफ्टनंट जनरल हैबतुल्ला अलीझाई यांनी दावा केला आहे की, तालिबानी वेगवेगळ्या गटांमध्ये विभागल्यामुळे अफगाणिस्तान पुन्हा एकदा गृहयुद्धाकडे वाटचाल करत आहे.

तालिबानमध्ये आता दुफळी झाली असून हा देश आता परदेशी आतंकवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनत चालला आहे. गेल्या दोन वर्षांत अफगाणिस्तान आतंकवाद्यांच्या नियंत्रणात गेले आहे. लेफ्टनंट जनरल हैबतुल्ला अलीझाई हे वर्ष २०२१ मध्ये जेव्हा राजधानी काबुल तालिबानच्या कह्यात होती, तेव्हा अफगाणिस्तानचे सैन्यप्रमुख होते.

अफगाणिस्तानमधून माघार, ही अमेरिकेची घोडचूक ! – माजी सैनिकी कमांडर

बायडेन प्रशासनाने अचानक अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेऊन मोठी चूक केली. त्यांना अफगाणिस्तानविषयी अधिक माहिती गोळा करण्याची आणि अफगाणिस्तानातील परिस्थितीमध्ये थोडे खोलवर जाण्याची संधी मिळाली होती; परंतु कुठलाही विचार न करता घाईघाईने त्या वेळी निर्णय घेण्यात आला, असे माजी सैनिकी कमांडर लेफ्टनंट जनरल हैबतुल्ला अलीझाई यांनी सांगितले.