मंदिराच्या पायर्‍यांवर लावली उदयनिधी यांची छायाचित्रे !

  • सनातन धर्म संपवण्याच्या उदयनिधी स्टॅलिन यांच्या विधानावरून इंदूर येथे आंदोलन

  • भाविक छायाचित्रांवर पाय देऊन जात आहेत मंदिरात !

इंदूर (मध्यप्रदेश) – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म संपवण्याच्या केलेल्या विधानाला हिंदूंचा विरोध चालूच आहे. इंदूर येथील एका मंदिराच्या पायर्‍यांवर लोकांनी उदयनिधी यांची छायाचित्रे लावली आहेत. त्यावर पाय ठेवून भाविक मंदिर ये-जा करत आहेत. इंदूरमधील हिंदु जागरण मंचच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारे निषेध करण्यात येत आहे.

हिंदु जागरण मंचचे इंदूर जिल्हा निमंत्रक कन्नू मिश्रा म्हणाले की, आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्यामुळे आम्ही मंदिराच्या पायर्‍यांवर उदयनिधी यांची छायाचित्रे लावली आहेत. उदयनिधी यांना आमचा विरोध असून यापुढेही आंदोलन करू. उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्या पद्धतीने सनातनविषयी विधान केले आहे, त्यामुळे त्याला आम्ही वेगळ्या पद्धतीने विरोध करत आहे. भविष्यातही अशाच प्रकारची आंदोलने विविध ठिकाणी होणार आहेत.

संपादकीय भूमिका

उदयनिधी यांना विरोध करतांना हिंदूंनी आपली परंपराही लक्षात घेणे आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला सनातन धर्माविषयी इतका द्वेष आहे, त्या व्यक्तीची छायाचित्रे मंदिराच्या पायर्‍यांवर लावण्याइतकीही तिची पात्रता नाही !