भारत शास्त्रज्ञांमुळेच चंद्रावर पोचला; मात्र पाकिस्तानचे शास्त्रज्ञ सुईही बनवू शकत नाहीत ! – पाकिस्तानी मौलवी
(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते )
इस्लामाबाद – भारतासह संपूर्ण जग ‘चंद्रयान ३’च्या यशाने भारावून गेले आहे. अंतराळातील भारताच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून भारतीय शास्त्रज्ञांची पाठ थोपटली जात आहे. पाकिस्तानी मौलवी इब्तिसाम इलाई झहीर यानेही भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक केले आहे. ‘भारत चंद्रावर पोचला असून पाकिस्तानचे शास्त्रज्ञ मात्र सुईही बनवू शकत नाहीत’, असे मौलवीने म्हटले आहे. अवकाश क्षेत्रातील अपयशासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना उत्तरदायी धरले आहे.
सौजन्य: NETA GIRI
मौलवी झहीर याने एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये म्हटले आहे की, हिंदु पंडितांनी भारताला चंद्रावर नेले नाही किंवा अमेरिका त्यांच्या पाद्य्रांमुळे चंद्रावर पोचलेला नाही. भारत आज चंद्रावर पोचला, तो शास्त्रज्ञांच्या बळावर. ‘इस्लाम हा पाकिस्तानच्या वैज्ञानिक प्रगतीत अडथळा आहे’, हा पाकिस्तानी फुटीरतावादी आणि उदारमतवादी यांचा युक्तीवाद त्यांनी फेटाळून लावला.