श्रीराममंदिराच्या खोदकामात सापडले आहेत देवतांच्या मूर्ती आणि स्तंभ !
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने छायाचित्र केले प्रसारित !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिराचे बांधकाम चालू आहे. या संदर्भात श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांनी ‘एक्स’वर (पूर्वीच्या ट्विटरवर) एक ट्वीट केले आहे. यात मंदिराच्या बांधकामाच्या वेळी येथे करण्यात आलेल्या खोदकामाच्या वेळी प्राचीन मंदिराचे अवशेष सापडले होते.
श्री रामजन्मभूमि पर खुदाई में मिले प्राचीन मंदिर के अवशेष। इसमें अनेकों मूर्तियाँ और स्तंभ शामिल हैं। pic.twitter.com/eCBPOtqE1W
— Champat Rai (@ChampatRaiVHP) September 12, 2023
त्या अवशेषांचे एक छायाचित्र राय यांनी प्रसारित केले आहे. यामध्ये देवतांच्या अनेक मूर्ती आणि स्तंभ दिसत आहेत. याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. श्रीराममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या वेळी सापडलेले अवशेष दर्शनासाठी ठेवले जाणार आहेत.