‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले काम करत आहेत !
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक !
मॉस्को (रशिया) – ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. ते पत्रकारांशी बोलत होते.
‘भारत से सीखें…’: मेक इन इंडिया का जिक्र कर रूस के राष्ट्रपति पुतिन ने की पीएम मोदी की तारीफ, जानें वजह#RussiaIndia #IndiaRussiaRelations #VladimirPutin #RussianPresident #PMNarendraModi #MakeInIndiahttps://t.co/mfSNFzt2Ge
— Amar Ujala (@AmarUjalaNews) September 13, 2023
पुतिन म्हणाले की,
१. पूर्वी आमच्या देशात चारचाकी वाहने बनत नव्हती; पण आता आम्ही ती बनवतो. हे खरे आहे की त्या ‘ऑडी’ आणि ‘मर्सिडीज’ या वाहनांपेक्षा अल्प दर्जाच्या आहेत; परंतु ही समस्या नाही. आपण रशियन बनावटीची वाहने वापरली पाहिजेत.
२. आपण आपला मित्र देश भारताचे अनुकरण केले पाहिजे. ते देशातच वाहने बनवत आहेत आणि वापरत आहेत. कोणत्या वर्गातील अधिकारी कोणत्या गाड्या चालवू शकतात, हे आपण ठरवले पाहिजे, जेणेकरून ते देशांतर्गत गाड्या वापरतील.
|
‘जी-२०’ परिषदेत भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन आदींनी आंतरराष्ट्रीय आर्थिक महामार्ग बनवण्याचा निर्णय घेतला. यावरही पुतिन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुतिन म्हणाले की, प्रस्तावित भारत-मध्य-पूर्व-युरोप-अमेरिका या आर्थिक महामार्गामुळे रशियाची कोणतीही हानी होणार नाही, तर लाभच होईल. या महामार्गामुळे रशियाला सोयीसुविधा विकसित करण्यात साहाय्य होणार आहे. या प्रकल्पावर बराच काळ चर्चा चालू होती. अमेरिका शेवटच्या क्षणी या करारात सामील झाली आहे; पण माझ्या मते अमेरिकेला या प्रकल्पाचा फारसा लाभ होणार नाही.