गोव्यातून भाग्यनगरला अमली पदार्थाची वाहतूक करणारे जाळे उद्ध्वस्त : तेलंगाणा पोलिसांची कारवाई
पणजी, १२ सप्टेंबर (वार्ता.) – गोव्यातून भाग्यनगर येथे अमली पदार्थांची वाहतूक करणारे व्यावसायिकांचे जाळे तेलंगाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एक ग्राहक आणि लिंगमपल्ली अनुराधा या महिला व्यावसायिकासह २ अमली पदार्थ व्यावसायिकांना कह्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ५१.४५ ग्रॅम कोकेन आणि ४४ ॲक्सटसी गोळ्या कह्यात घेतल्या आहेत.
#DRUGS SEIZED: Two drug #peddlers and a #consumer arrested in #Hyderabad following a trip in Goa
Read: https://t.co/OPVJ4tA2ls#Goa #News #Crime #Drugs pic.twitter.com/f0gSNIb9hD
— Herald Goa (@oheraldogoa) September 12, 2023
तेलंगाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित गोवा येथून अमली पदार्थ विकत घेऊन ते खासगी बसगाड्यांच्या माध्यमातून भाग्यनगर येथे नेऊन त्यांची तेथे विक्री करत होते. लिंगमपल्ली अनुराधा हिने ‘ती गोव्यातून अमली पदार्थ आणत होती’, याची स्वीकृती पोलिसांना दिली आहे. संशयित लिंगमपल्ली अनुराधा आणि तिचे दोन मित्र भाग्यनगर येथे जेवणाचा डबा पुरवण्याचे केंद्र चालवत होते.