पुण्यातील बुधवार पेठेतून अवैधरित्या वास्तव्य करणार्या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक !
पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या चिंताजनक !
पुणे – बुधवार पेठेतील शरीरविक्रय करणार्या महिलांचे वास्तव्य असलेल्या गल्लीत काही बांगलादेशी महिला आणि पुरुष अवैधरित्या रहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुणे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शहरात विनापरवाना रहाणार्या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या महिन्याभरात केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत २६ बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आले आहे.
यापूर्वीही पुण्यातील बुधवारपेठ परिसरातून १९ बांगलादेशी नागरिकांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कह्यात घेतले होते. हे सर्वजण अवैध पद्धतीने पुण्यात वास्तव्य करतांना आढळून आले होते.
संपादकीय भूमिका :बांगलादेशी घुसखोरांची संख्या किती प्रमाणात वाढली असेल, हे या घटनेतून लक्षात येते. भारतात घुसलेल्या लाखो बांगलादेशींपैकी केवळ काहींनाच अटक होते. ही समस्या मुळापासून दुरुस्त करण्यासाठी सरकार उपाययोजना करणार का ? |