(म्हणे) ‘निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्याकडून नरसंहाराची शक्यता !’ – प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
मुंबई – भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा जातीद्वेष आणि त्यातून हत्या घडवून आणण्याचा इतिहास आहे. निवडणूक जिंकण्याचे हे त्यांचे पारंपरिक धोरण दिसते. आता लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असतांना गुजरात दंगलीप्रमाणे भारतातील लोकशाही, मुसलमान, दलित आणि आदिवासी बहुजन यांचा नरसंहार करण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही, अशी शक्यता वाटते, असे ट्वीट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद़्घाटनासाठी जाणार्या भाविकांना ‘झेड प्लस’ सुरक्षा प्रदान करावी, तसेच श्रीराम मंदिराच्या सुरक्षेचे दायित्व राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांकडे सोपवावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या.
भाजपा-आरएसएस देशात दंगली घडवू शकतात – प्रकाश आंबेडकर @Prksh_Ambedkar #BJP @azadmarathi https://t.co/gbdnO3NSVa
— Azad Marathi (@AzadMarathi) September 12, 2023
संपादकीय भूमिका :देशात दंगली घडवणार्यांविषयी, तसेच आतंकवादी कारवाया करणार्यांविषयी चकार शब्दही न काढता हिंदूंनाच हिंसक ठरवणे, हा हिंदुद्वेष ! |