राष्ट्रीय लोकअदालतीत ५६ सहस्र प्रकरणांचा तडजोडीने निकाल !
१४३ कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यासह ८० कोटी रुपयांची कर्जवसुली !
नागपूर – येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ५६ सहस्र ८३१ प्रकरणे तडजोड करून निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांचे एकूण तडजोड मूल्य १४३ कोटी रुपये आहे. जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसुली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक आणि कामगार न्यायालय अन् जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एस्.बी. अग्रवाल यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद़्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालतीत २३ घटस्फोट आणि कौटुंबिक वाद प्रकरणांतील पती-पत्नी यांच्यामध्ये तडजोड झाली.