उत्तराखंडमधील मदरशांत संस्कृत भाषा शिकवणार ! – वक्फ बोर्डाचा निर्णय
अन्य भाषांसह संस्कृत असणार पर्यायी भाषा !
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील मदरशांमध्ये ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ अर्थात् ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अंतर्गत येणारे विषय शिकवले जाणार आहेत. यात संस्कृतचाही समावेश आहे. वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी ही माहिती दिली. मदरशांतील मुसलमान विद्यार्थी संस्कृत, हिंदी, अरबी अथवा अन्य कोणत्याही विषयाची निवड करू शकतात. एका विद्यार्थ्याकडून संस्कृतमध्ये कुराण लिहिण्यात आले आहे.
शादाब शम्स यांनी पुढे सांगितले की, राज्यातील ४ जिल्ह्यांतील मदरशांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. येथे ‘एका हातात लॅपटॉप आणि दुसर्या हातात कुराण’ असे धोरण राबवण्यात येणार आहे. (जगभरातील मदरशांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर कुठेच असे झालेले नाही. त्यामुळे हे शक्य होईल का ?, हा प्रश्नच आहे ! – संपादक)
राज्य के मदरसों में पढ़ाई जाएगी संस्कृत, वक्फ बोर्ड के अध्यक्ष बोले- मुस्लिम समाज अपग्रेड से खुश#SanskritInMadarsa #Madarsa https://t.co/JSy7zEJg9R
— IBC24 News (@IBC24News) September 12, 2023
संपादकीय भूमिकासंस्कृतला देशात अन्यत्रही पर्यायी भाषा म्हणून ठेवण्यात आले आहे. हिंदु राष्ट्रात संस्कृत पर्यायी नाही, तर अनिवार्य भाषा असेल ! |