डिझेल वाहनांवर अतिरिक्त १० टक्के ‘जी.एस्.टी.’ कर लावण्याचा प्रस्ताव नाही ! – नितीन गडकरी
नवी देहली – डिझेल वाहनांवर अतिरिक्त १० टक्के ‘जी.एस्.टी.’ कर लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असा खुलासा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी सांगितले. ‘गडकरी यांनी अर्थमंत्र्यांना डिझेल वाहनांवर अतिरिक्त १० टक्के कर लावण्याविषयी सूचवले आहे’, असे वृत्त सर्वत्र पसरले होत. त्यावर गडकरी यांनी हा खुलासा केला.