मुंब्रा येथे जिलेटीनच्‍या कांड्या आणि डिटोनेटर सापडले !

पोलिसांनी कारवाई करून  स्‍फोटकांचा साठा जप्‍त केला

ठाणे, १२ सप्‍टेंबर (वार्ता.) – मुंब्रा येथील रेतीबंदर दिवा खाडी परिसरात ठाणे पोलिसांना स्‍फोटकांचा साठा सापडला आहे. यात १६ जिलेटिनच्‍या कांड्या आणि १७ डिटोनेटर आढळून आले असून १२ सप्‍टेंबरला पोलिसांनी कारवाई करून हा साठा जप्‍त केला आहे. खाडीत २ बार्ज आढळून आले असून ते कुणाच्‍या मालकीचे आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत. ज्‍या ठिकाणी जिलेटिनच्‍या कांड्या पोलिसांना मिळाल्‍या, त्‍याच परिसरात गणेशमूर्ती विसर्जन सोहळा असतो. या प्रकरणी पोलीस पुढील अन्‍वेषण करत आहेत.