विद्यालयांतून इस्लामीकरण !
संपादकीय
‘गोव्यातील दाबोळी येथील केशव स्मृती विद्यालय या सरकारी अनुदानित शाळेच्या विद्यार्थ्यांना ‘मशीद दर्शन’च्या नावाखाली मशिदीत नेऊन नमाजपठणासंबंधी कृती करण्यास भाग पाडणे आणि विद्यार्थिनींना गणवेशाची ओढणी हिजाबप्रमाणे परिधान करण्यास लावणे’, ही अतिशय संतापजनक गोष्ट आहे. ती पूर्वनियोजित घटना असल्याचे उघड होत असल्याने अधिक गंभीर आणि ‘हिंदूंनी खडबडून जागे झाले पाहिजे’, याची जाणीव करून देणारी आहे. येथे मौलानांनी विद्यार्थ्यांना इस्लाममधील शब्दांचे अर्थ आणि नमाजपठणाचे महत्त्व यांची माहितीही सांगितली. एवढ्यावरच न थांबता ‘तुम्ही दगडाच्या देवाला पूजता. आम्ही आकाशातील देवाला पूजतो’, अशी हिंदु धर्माशी तुलना करून विद्यार्थ्यांची दिशाभूलही केली. या घटनेनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आंदोलन करावे लागले, पोलिसांत तक्रार द्यावी लागली, तेव्हा कुठे संबंधित प्राचार्य शंकर गावकर यांना निलंबित करण्यात आले.
‘पी.एफ्.आय.’चे षड्यंत्र !
‘महिलांना मशिदीमध्ये अनुमती असली, तरी त्या पुरुषांसमवेत बसू शकत नाहीत, वेगळी जागा असेल, तर जाऊ शकतात’, असे इस्लाममध्ये सांगितले जाते. अशी वेगळी जागा बहुतांश मशिदीत नसते. त्यामुळे भारतासारख्या मोकळ्या देशात तरी महिला मशिदीत जात नाहीत. या संदर्भात मौलवींची मतेही वेगवेगळी आहेत. स्वधर्माच्या महिलांना मशिदीत पुरुषांसमवेत अनुमती नसतांना हिंदूंच्या अल्पवयीन मुलींना मशिदीमध्ये नेण्यामागचे कारण कळण्यासाठी कुणा मोठ्या विचारवंताची आवश्यकता नाही. ‘पी.एफ्.आय.’ची (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची) विद्यार्थी संघटना असलेल्या ‘स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया’ने विद्यार्थ्यांना ‘मशीद दर्शन’ करण्यासाठी आणि ‘इस्लामी कार्यशाळे’साठी मशिदीत आणण्याचे आवाहन केले होते. हा तथाकथित उपक्रम त्यांच्या ‘भारतभर अनेकविध माध्यमांतून ‘जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ करण्याच्या व्यापक षड्यंत्राचा भाग आहे’, हे या घटनेतून उघड झाले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मशिदीत १-२ नव्हे, तर तब्बल ८ मौलाना होते, यावरून ‘धर्मांतराचे किती पद्धतशीर नियोजन आहे’, याची कल्पना येईल. हिंदूंना शाळेत धर्मशिक्षणाची सोय उपलब्ध नाही; परंतु आता त्यांना त्यांचा गौरवशाली इतिहास शिकवण्याची संधी काही प्रमाणात का होईना, नवीन पाठ्यक्रमातून मिळू शकणार आहे. त्यातून त्यांचा धर्माभिमान जागृत होण्याची शक्यता आहे. सध्या सामाजिक माध्यमांतूनही मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्ये सनातन हिंदु धर्माचे महत्त्व विशद करणारे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. एकीकडे ‘लव्ह जिहाद’विषयीही मोठ्या प्रमाणात जागृती होत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यंतरी ठिकठिकाणी मुलींना हिजाब घालण्याचे पद्धतशीर नियोजन करण्यात येत असल्याचा घटना उघड झाल्या. त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांना मशिदीत नेऊन इस्लामचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या बालमनावर इस्लामचे महत्त्व कोरण्याचे षड्यंत्र या जिहादी संघटनेने आखले आहे. घरात आणि शाळेत हिंदु धर्माचे धडे न मिळालेल्या हिंदु विद्यार्थ्यांना थेट इस्लामची शिकवण दिली, तर काय होईल ? कॉन्व्हेंटमध्ये शिकलेले हिंदु विद्यार्थी जसे इंग्रजाळलेले होतात, तसेच हे प्रमाण वाढत गेले, तर हिंदु विद्यार्थी इस्लामी होणार नाहीत का ? ‘स्कूल जिहाद’चे हे षड्यंत्र रचणार्या ‘पी.एफ्.आय.’वर गेली अनेक वर्षेेे बंदीची मागणी होत आहे. देशातील अनेक जिहादी घटनांमध्ये सहभागी असणार्या ‘पी.एफ्.आय.’ची ही नवीन खेळी समोर आली आहे. आतापर्यंत देशातील विविध भागांमध्ये अशा प्रकारे उपक्रम राबवण्याचे नियोजन चालू झाले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यावरून ‘हिंदूंचे दायित्व किती वाढले आहे’, हे लक्षात येते. सामाजिक माध्यमातून या घटनेची छायाचित्रे प्रसारित झाल्यामुळे ही घटना उघड झाली. ग्रामीण भागांतून विद्यार्थ्यांना असे थेट मशिदीत नेऊन इस्लामचे धडे देण्याचे उपक्रम चालू झाले, तर ते कळणारही नाहीत. ‘गेम जिहाद’नंतर आता विद्यार्थीदशेपासूनच इस्लामकडे आकर्षित करण्याच्या या षड्यंत्राचे दूरगामी परिणाम गंभीर आहेत. ‘वर्ष २०४७ मध्ये भारताचे ‘खुरासान’ (इस्लामी राज्य) करण्याचे स्वप्न पहाणार्यांनी केलेले हे धूर्त नियोजन आहे’, हे हिंदूंनी समजून घेतले पाहिजे.
प्राचार्यांचे वागणे संशयास्पद !
अल्पवयीन विद्यार्थ्यांना मंदिर, मशीद, चर्च आदी धार्मिक स्थळे बाहेरून दाखवण्याचा नियम असतांना प्राचार्य शंकर गावकर यांनी विद्यार्थ्यांना मशिदीच्या आत नेण्याचे नियोजन कसे होऊ दिले ? ‘मशिदीत नेणे’ हा काही शाळेतील कुठल्याही अभ्यासक्रमाचा भाग नव्हता. असे असतांना प्राचार्यांनी मुलांना मशिदीत नेण्याचे कारणच काय होते ? महत्त्वाचे म्हणजे या प्राचार्यांनी शाळेच्या व्यवस्थापनालाही याची कल्पना दिली नव्हती. मग असे लपूनछपून, कुणालाही न सांगता विद्यार्थ्यांना मशिदीत नेण्यामागचा उद्देश संशयास्पद नव्हे का ? काही विद्यार्थी मशिदीच्या आत जाण्यास सिद्ध नव्हते, तरीही त्यांना आत जाण्यास भाग पाडणे, हेही या प्राचार्यांच्या हेतूविषयी निश्चितपणे शंका घेण्यासारखे आहे. या प्राचार्यांना केवळ निलंबनाची शिक्षा उपयोगाची नाही. ‘फसवून धर्मांतराचा कट रचणार्याशी त्यांनी हातमिळवणी केली आहे’, हे येथे स्पष्टपणे पुढे आले आहे. आतापर्यंत या प्राचार्यांनी अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी केल्या आहेत का ? तेही पडताळावे लागेल. यासाठी त्यांना इस्लामी मंडळींकडून नेमके काय मिळाले आहे ? त्याचाही शोध घ्यावा लागेल. त्यामुळे केवळ निलंबन पुरेसे नसून हिंदु समाजाने त्यांना खडसावून त्यांनी केलेल्या चुकीच्या हिंदुद्रोही कृत्याची पदोपदी जाणीव होईल, असे केले पाहिजे. ‘स्वधर्मियांच्या धर्मांतराला हातभार लावणे’, हे किती पाप असू शकते, याची गावकर यांना कल्पना नाही, असेच यावरून लक्षात येते.
‘पी.एफ्.आय.’ आणि तिची विद्यार्थी संघटना यांवर बंदीची मागणी करण्यासमवेतच देशातील प्रत्येक शाळेमध्ये असे प्रकार चालले आहेत का ? याची सखोल चौकशी करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी शासनाकडे निक्षून केली पाहिजे. पालकांनीही शाळांमध्ये असे होऊ नये, यासाठी दबाव आणला पाहिजे.
‘पी.एफ्.आय.’च्या ‘स्कूल जिहाद’चे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी सरकार आता काय करणार आहे ? |
हे ही वाचा –
♦ गोवा : सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ३० हिंदु विद्यार्थ्यांना मशिदीत पाठवून इस्लामनुसार कृती करायला लावली !
https://sanatanprabhat.org/marathi/719656.html
♦ गोवा : हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनानंतर विद्यालयाचे प्राचार्य शंकर गावकर सेवेतून निलंबित
https://sanatanprabhat.org/marathi/719387.html