पुरेशा उपस्थितीअभावी उत्तरप्रदेशातील २४० मदरशांची मान्यता रहित !
अनेक मदरशांकडून मान्यता रहित करण्याची स्वतःहूनच मागणी !
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पुरेशा उपस्थितीअभावी उत्तरप्रदेश राज्यातील २४० मदरशांची मान्यता रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा अल्पसंख्यांक कल्याण विभागाच्या अधिकार्यांनी ‘उत्तरप्रदेश मदरसा शिक्षण मंडळा’ला अशा मदरशांची सूची पाठवली आहे. यांतील अनेक मदरसे चालूही नाहीत.
UP: राज्य के 200 से ज्यादा मदरसों की खत्म की जाएगी मान्यता, जानिए क्या है वजह?#UPNews #Madrasa https://t.co/oKdVCWvQNl pic.twitter.com/AGSYXnc89N
— News State UP & UK (@NewsStateHindi) September 12, 2023
अनेक मदरशांमध्ये वर्ष २०१६ मधील ‘मदरसा नियमावली’नुसार अल्प उपस्थिती असल्याने मदरशांनी त्यांची कागदपत्रे संकेतस्थळावर प्रसारित केलेली नाहीत. काही मदरशांनी तर स्वतःहूनच स्वतःची मान्यता रहित करण्याची मागणी ‘उत्तरप्रदेश मदरसा शिक्षण मंडळा’कडे केली आहे. राज्यातील एकूण १६ सहस्र ४५० मदरसे मान्यताप्राप्त आहेत. यांतील ५६० मदरसे अनुदानित आहेत. मदरसा शिक्षण मंडळाच्या परीक्षांमध्ये प्रत्येक वर्षी परीक्षार्थींची संख्या झपाट्याने घटत आहे. या वर्षी राज्यभरातील मदरशांपैकी केवळ १ लाख ७२ सहस्र आवेदने आली होती.
संपादकीय भूमिकाधर्मनिरपेक्ष देशात सरकारी पैशांतून मुसलमानांना धार्मिक शिक्षण देणे, हा देशातील बहुसंख्य हिंदूंवर अन्याय, तर राज्यघटनेने जनतेला दिलेल्या समानतेच्या अधिकाराची पायमल्ली आहे ! तथापि स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतची सर्व सरकारे केवळ मतांसाठी हिंदूंवर अन्याय करून मुसलमानांचे लांगूलचालन करत आहेत ! हे चित्र पालटणे आवश्यक आहे ! |