सिंधदुर्ग : नांदगाव येथे २ मंदिरांत चोरी
कणकवली – तालुक्यातील बिडयेवाडी, नांदगाव येथील श्री दिर्बादेवी मंदिर आणि श्री रवळनाथ मंदिर या २ मंदिरांतील दानपेट्या अज्ञाताने फोडल्या आणि आतील रोख रक्कम चोरली. नांदगाव येथील महादेव शंकर मोरये १० सप्टेंबर या दिवशी सकाळी मंदिरांत पूजेसाठी आले असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. याविषयी येथील पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंची असुरक्षित मंदिरे ! |