शिवसेना आमदारांच्या अपात्रतेविषयी १४ सप्टेंबर या दिवशी विधीमंडळात सुनावणी !
मुंबई – शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी १४ सप्टेंबर या दिवशी विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार आहे. विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेच्या ४०, तर उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांचा यामध्ये समावेश आहे. याविषयीच्या एकूण ३४ याचिका आल्या असून यातील प्रत्येक याचिकेवर सुनावणी होणार आहे. दुपारी १२ वाजता सुनावणीला प्रारंभ होणार आहे. दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयीची सुनावणी विधीमंडळाने घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे.