कल्याण येथे अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी अटकेत
इराणी महिलेचाही सहभाग !
ठाणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) – कोळसेवाडी पोलिसांनी अमली पदार्थ (ड्रग्ज) तस्कर नायजेरियन नागरिक चुकवुईमेका जोसेफ इमेका याच्यासह सुनील यादव, युवराज गुप्ता या २ आरोपींना अटक केली आहे, तर कल्याण येथील खडकपाडा पोलिसांनी आंबिवली येथील इराणी वस्तीमधून फाजी इराणी या महिला अमली पदार्थ तस्कराला अटक केली आहे. या ४ आरोपींकडून पोलिसांनी ७ लाख रुपये किंमतीचा ३०० ग्रॅम एम्डी हा अमली पदार्थ हस्तगत केला आहे. (समाजाला नशेच्या खाईत लोटणार्यांवर कठोर कारवाई झाल्यासच अशा गुन्ह्यांना आळा बसेल ! – संपादक)