स्वतःच्या मनाने दीर्घ काळ औषधे घेणे टाळावे !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २३६
‘अनेक जण मधुमेह बरा व्हावा, यासाठी स्वतःच्या मनाने कारले, जांभूळ बी इत्यादींचे चूर्ण नियमितपणे घेत असतात. ‘आयुर्वेदिक औषधांचे दुष्परिणाम नसतात’, असे म्हणून अशी औषधे घेणे चालू असते. अशा प्रकारे स्वतःच्या मनाने औषधे घेणे चुकीचे आहे. कारले, जांभूळ बी यांसारखी कडू औषधे दीर्घ काळ घेतल्याने संधीवात, दमा, खोकला, वजन न्यून होणे यांसारखे विकार होऊ शकतात. त्यामुळे स्वतःच्या मनाने दीर्घ काळ (साधारणपणे एका मासापेक्षा जास्त काळ) औषधे न घेता वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.९.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan