मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण दिल्यास तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही ! – गिरीश महाजन, मंत्री
नाशिक – कुणबी समाज वेगवेगळ्या भागांत असून मराठवाड्यातील निजाम काळातून वेगळे झाल्यानंतर समाज ‘कुणबी मराठा’ झाला. आता ते मागणी करतात की, संपूर्ण राज्यातील मराठा समाजाला ‘कुणबी’ म्हणून दाखला द्यावा; मात्र हे कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. सरसकट ‘कुणबी’ म्हणून आरक्षण दिले, तर ते न्यायालयात टिकणार नाही. ते पहिल्याच दिवशी फेटाळले जाईल. यावर तोडगा काढण्यासाठी वेळ दिला पाहिजे, असा शब्दांत ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी ११ सप्टेंबर या दिवशी मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केली.