‘आज तक’ वृत्तवाहिनीकडून हिंदूंच्या देवता आणि राजा मुचकुंद यांचा अवमान !
‘जी-२०’ परिषदेसाठी काम करणार्या कर्मचार्यांशी केली तुलना !
मुंबई – हिंदी वृत्तवाहिनी ‘आज तक’कडून हिंदूंच्या देवता आणि राजा मुचकुंद यांचा अवमान करण्यात आला आहे. जी-२० परिषदेसाठी ज्या कर्मचार्यांनी परिश्रम घेतले, त्यांची समारोपानंतरची स्थिती कशी असेल ?, यावरून या वाहिनीने तिच्या ‘एक्स’ खात्यावरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये पौराणिक कथेच्या मालिकेतील प्रसंग दाखवण्यात आला आहे. यात राजा मुचकुंद देवतांना असुरांच्या विरोधातील युद्धात विजय मिळवून दिल्यावर देवतांना विनंती करत आहे. राजा मुचकुंद म्हणतो, ‘मी युद्ध करून फारच दमलो असून मला आता विश्रांती घ्यायची आहे.’ या प्रसंगावरून या व्हिडिओला एक मथळा ‘जी-२० परिषदेच्या समाप्तीनंतर या सेवेत असणारे सर्व कर्मचारी’, असा मथळा देण्यात आला आहे. या प्रसंगातून ‘आज तक’ने राजा मुचकुंद यांची तुलना परिषदेसाठी काम करणार्या कर्मचार्यांशी केली आहे. हिंदूंकडून याला विरोध केला जात आहे. अनेकांनी ट्वीट करून टीका केली आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान करणार्या या वाहिनीला लाज कशी वाटली नाही ? विनोदनिर्मिती करण्याच्या नावाखाली अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा अवमान करण्याचे धाडस या वाहिनीने कधी दाखवलेले नाही, हे लक्षात घ्या ! |