निधर्मीवाद्यांसाठी ख्रिस्‍ती धर्मानुसार प्रार्थना ही सभ्‍यता, तर हिंदु धर्मानुसार पूजा करणे ही अंधश्रद्धा !

अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष जो बायडेन यांनी नवी देहली येथे ख्रिस्‍ती धर्मगुरूंच्‍या मार्गदर्शनाखाली जी-२० शिखर परिषद यशस्‍वी होण्‍यासाठी प्रार्थना केली. ‘शिखर परिषद यशस्‍वी होऊ दे, त्‍यात सर्व प्रतिनिधींना सहभागी होता येऊ दे  आणि जागतिक सूत्रावर तोडगा निघू दे’, यांसाठी त्‍यांनी प्रार्थना केली. या प्रार्थनेसाठी गोव्‍यातील पाद्री निकोलस डायस यांना निमंत्रित करण्‍यात आले होते.

लोकशाहीप्रधान देश असलेल्‍या अमेरिकेच्‍या ख्रिस्‍ती राष्‍ट्राध्‍यक्षांनी ख्रिस्‍ती धर्मानुसार जी-२० शिखर परिषदेच्‍या यशासाठी प्रार्थना करणे, हे सभ्‍यतेचे लक्षण ठरते. याविषयी धर्मनिरपेक्षतावादी, पुरो(अधो)गामी आणि साम्‍यवादी मौन बाळगून त्‍याला मूकसंमती देतात; परंतु याच उद्देशाने हिंदु धर्मानुसार पूजा-अर्चा केली की ती अंधश्रद्धा ठरते !