मध्यप्रदेशातील भोजशाळेत अज्ञातांनी ठेवली देवतेची प्राचीन मूर्ती !
भोपाळ (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञातांकडून देवतेची मूर्ती ठेवण्यात आली. पोलिसांनी नंतर ही मूर्ती तेथून हटवली. ही ११व्या शतकातील मूर्ती होती. मूर्ती ठेवल्याच्या घटनेनंतर भोजशाळेभोवतीची सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने ही वास्तू संरक्षित असल्याचे घोषित केले आहे.
मध्यप्रदेश
▶️ भोजशाला आज के लिए की गई बंद।
▶️ मां वाग्देवी की प्रतिमा रखने के विवाद के बाद फैसला#Dhar | #MadhyaPradesh | #MPNews pic.twitter.com/a3KOoa2gV2
— IBC24 News (@IBC24News) September 10, 2023
भोजशाळा राजा भोज याने बांधली होती. मोगलांच्या काळात त्यावर आक्रमण होऊन ती मुसलमानांच्या कह्यात गेली. तेव्हापासून ती त्यांच्याच कह्यात आहे. ‘ही भोजशाळा वाग्देवीचे (श्री सरस्वतीदेवीचे) मंदिर आहे’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे, तर मुसलमान त्याला कमाल मौला मशीद मानतात. हिंदू भोजशाळा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यातूनच ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या भोजशाळेत श्री सरस्वती देवीची मूर्ती होती. ती विदेशात नेण्यात आली आहे. हिंदूंनी ही मूर्ती परत आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
संपादकीय भूमिकाभोजशाळा श्री सरस्वतीदेवीचे प्राचीन मंदिर असल्याने ते हिंदूंच्या कह्यात देणे आवश्यक असून तेथून मुसलमानांची मशीद हटवण्यासाठी केंद्र आणि राज्य येथील भाजप सरकारांनी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते ! |