केरळमधील ख्रिस्ती पाद्रीने भगवान अय्यप्पांचे ‘व्रतम्’ पाळल्यामुळे चर्चला पोटशूळ !
चर्चने स्पष्टीकरण मागताच पाद्रीकडून चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत !
तिरुवंनतपूरम् (केरळ) – केरळमधील एका ख्रिस्ती पाद्रीने प्रसिद्ध शबरीमला मंदिरात भगवान अय्यप्पांची ४१ दिवसांचे ‘व्रतम्’ (व्रत) पाळल्यावरून चर्चने त्यांना कठोर शब्दात ठणकावले. यानंतर पाद्रीने चर्चचे ओळखपत्र आणि परवाना परत केला. ‘अँग्लिकन चर्च ऑफ इंडिया’चे पाद्री रेव मनोज केजी हे ४१ दिवस चालणारे ‘व्रतम्’ पाळत आहेत.
A Christian priest in Kerala capital Thiruvananthapuram relinquished his licence to hold pastoral services to go on a pilgrimage to Sabarimala, the forest abode of Lord Ayyappa. @KAShaji123 reports on the implications of his decisionhttps://t.co/k8eK9FOy3W
— South First (@TheSouthfirst) September 11, 2023
चर्चला याविषयी समजल्यावर चर्चने पाद्री रेव मनोज केजी यांनी चर्चची तत्त्वे आणि नियम यांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. पाद्रीने स्पष्टीकरण देण्याऐवजी चर्चने दिलेले ओळखपत्र आणि परवाना परत केला. पाद्री मनोज म्हणाले, ‘‘माझे कार्य चर्चच्या तत्त्वांवर आधारित नव्हते, तर ते परमेश्वराच्या तत्त्वावर आधारित होते. देवाने प्रत्येकाला, मग तो कुठल्याही जात, पंथ किंवा धर्माचा असो, प्रेम करायला सांगितले आहे. तुमचे देवावर प्रेम आहे कि चर्चवर ?, तुम्ही ठरवू शकता. मी काहीही चुकीचे केले नाही. माझा हेतू हिंदु धर्माला त्याच्या कर्मकांडांच्या पलीकडे समजून घेण्याचा आहे, जसे मी ख्रिस्ती धर्माविषयी केले.’’
संपादकीय भूमिकाएरव्ही हिंदूंना सर्वधर्म समभावाचे डोस पाजणारे पुरोगामी, नास्तिकतावादी, काँग्रेसवाले, डावे आता चर्चला असे डोस का पाजत नाहीत ? |