मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती गठीत ! – प्रवीण दरेकर, आमदार
नवी मुंबई, १० सप्टेंबर (वार्ता.) – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमकी कार्यपद्धत कशी असावी, हे ठरवण्यासाठी निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार तथा मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी वाशी येथे दिली. माथाडी भवन येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.