तलाठी परीक्षेत ‘टी.सी.एस्.’चे कंत्राटी कर्मचारी चालवत होते रॅकेट !
छत्रपती संभाजीनगर येथील तलाठी परीक्षा घोटाळा प्रकरण
छत्रपती संभाजीनगर – तलाठी परीक्षेत थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात असल्याचे निदर्शनास आले होते. ही परीक्षा घेणार्या ‘टी.सी.एस्.’च्या २ कंत्राटी कर्मचार्यांनी हाऊसकीपिंगच्या महिलेला हाताशी धरून उत्तरे कागदावर लिहून उमेदवारांना दिली आहेत. शाहरूख आणि पवन या दोन कंत्राटी कर्मचार्यांकडे टी.सी.एस्. आणि आयऑन डिजीटल या २ आस्थापनांच्या नावाचे म्हणजे ‘टिस्कॉन’ नावाचे आयकार्ड मिळाले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.