उदयनिधी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी कल्याण येथे उपोषण !
ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – सनातन धर्माविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उदयनिधी यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करावा; म्हणून कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या बाजूला सकल हिंदु समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. त्या वेळी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी उदयनिधीचा तीव्र निषेध केला. (हिंदुबहुल देशात अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)