भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून देणारा जागतिक विश्वबंधुत्व दिन !
आज जागतिक विश्वबंधुत्व दिन आहे. त्या निमित्ताने…
‘जगभरात ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ‘सर्वधर्म परिषदे’त केलेल्या अतिशय प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाच्या कल्पनेची माहिती मिळाली.
सर्वधर्म परिषदेत भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय
तत्कालीन परिस्थितीत आपल्याला स्वतःचा विचार मांडण्याचा अधिकारच नव्हता. सगळीकडून विरोधाचे स्वर उमटत होते. स्वामीजींकडे अशी कुठली तरी शक्ती होती की, जिच्यामुळे त्यांच्या स्वतःवर कुठलेही दडपण आले नाही. ११ सप्टेंबर १८९३ हा दिवस उजाडला. ते ‘सर्वधर्म परिषदे’मध्ये भाषण करण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी ‘माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो’, हे शब्द उच्चारले. तेव्हा अनेक मिनिटे सभागृहात टाळ्यांचा कडकडाट होत होता. या दोन शब्दांनी भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून दिला होता. त्या वेळी जगातील अनेक दिग्गज तेथे उपस्थित होते. स्वामीजींनी एखाद्या कुशल वक्त्याप्रमाणे भाषण करून जगाला जिंकून घेतले. त्यांच्या भाषणाने जगात एक इतिहास रचला गेला.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे