पुणे जिल्ह्यातील ४६ माध्यमिक शाळा अनुदानास अपात्र !
पुणे – राज्यातील विनाअनुदानित माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासाठी गेल्या वर्षीच्या सुधारित निकषांनुसार प्रस्ताव मागवण्यात आले होते. या शाळांच्या प्रस्तावांची पडताळणी केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील ४६ शाळा अनुदानास अपात्र ठरल्या आहेत. त्यातील ५ शाळा या पिंपरीमधील आहेत. त्यांना त्वरित त्रुटींची पूर्तता करून माहिती सादर करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागांनी दिले आहेत. राज्य सरकारकडून २०, ४० आणि ६० टक्के अनुदान देण्यात येते; मात्र काही शाळा वारंवार माहिती मागवूनही याकडे दुर्लक्ष करत आहेत. काही शाळांनी एकदाही प्रस्ताव सादर केलेला नाही. अशा शाळांची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने मागवली आहे. (वारंवार माहिती मागवूनही न देणार्या शाळेतील विद्यार्थी कशा प्रकारे घडत असतील ? शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक)
शाळांची विद्यार्थी संख्या, वर्ग, तुकडी, वर्ष २०१८-१९ आणि २०२२-२३ च्या संच मान्यतेनुसार संमत शिक्षक, शिक्षकेतर पदे आणि कार्यरत पदांची माहिती सादर करण्यास मुख्याध्यापकांसह संस्थाचालकांकडून दिरंगाई केली जाते.