‘ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेकडून श्री गणेशचतुर्थीला ‘ऑनलाईन’ श्री गणेशपूजेचे विनामूल्य आयोजन !
डोंबिवली – गणेशोत्सवाचे निमित्त साधून घरच्या घरी श्री गणेशाची भक्तीभावाने शास्त्रशुद्ध पूजा करता यावी, यासाठी ‘ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ‘ऑल इन वन गुरुजी’ या ‘यूट्यूब’ वाहिनीवरून श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी म्हणजे १९ सप्टेंबरला मराठी आणि हिंदी या भाषांतून विविध मुहुर्तांच्या वेळेत श्री गणेशपूजा आणि प्राणप्रतिष्ठा यांचे पारंपरिक पद्धतीने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
१. गणेशपूजा पहाटे ४, सकाळी ६, सकाळी ८, १०, त्यानंतर दुपारी १२ वाजता दाखवण्यात येईल. ‘ऑल इन वन गुरुजी’ या संस्थेचे गुरुजी हळूवारपणे पूजा सांगतील, पूजेच्या प्रत्येक कृतीनंतर दहा सेकंद थांबवून पुढची कृती करण्यात येईल.
२. ऑनलाईन यूट्यूब पूजा चालू होण्याआधी पूजेची मांडणी कशी करावी ?, तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य आणि सामग्री यांची सूचीही सांगतील.
३. मराठी आणि हिंदी भाषेत चित्रीकरण केलेला भाग ‘यूट्यूब’ वाहिनीवर उपलब्ध असून १९ सप्टेंबरला करण्यात येणार्या पूजेच्या पूर्व नियोजनासाठी याचे साहाय्य होईल.
४. ‘घरातील तरुणांनी पुढाकार घेत ‘ऑल इन वन गुरुजी’ या वाहिनीद्वारे पूजा करून सर्वांनी आध्यात्मिक लाभ घेऊया’, असे आवाहन ‘ऑल इन वन गुरुजी डॉट कॉम’ या संस्थेचे प्रमुख श्री. सचिन कुलकर्णीगुरुजी आणि श्री. सागर धारगळकर (आयटी विशेषज्ञ) यांनी केले आहे.
५. पूजेची सामग्री, तसेच पूजेच्या वेळी करण्यात येणारे सर्व नियोजन हे संस्थेच्या ‘अँड्रॉइड ॲप’ आणि संकेतस्थळ यांवर उपलब्ध आहे. ऑनलाईन गणेश पूजेसाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा पैसे देण्याचे बंधन नाही.
‘ऑल इन वन गुरुजी डॉट कॉम’ ही एक धार्मिक संस्था आहे. धार्मिक विधी आणि अंत्येष्टी यांसारख्या पूजाविधीसाठी येथे १०० हून अधिक गुरुजी जोडलेले आहेत. शास्त्रानुसार पूजा होण्यासाठी सर्व गुरुजींना येथे वेगळे प्रशिक्षण दिले जाते. सर्व प्रकारचे धार्मिक पूजाविधी, व्रत, गोंधळ, ज्योतिष, मृत्यूत्तर कर्म, श्राद्ध अशा प्रकारच्या सेवा या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. यानंतर गुरुजी आपल्या घरी प्रत्यक्ष येऊन पूजा करतील. या संकेतस्थळावर सर्व प्रकारच्या पूजेची माहिती, सामग्री, तसेच पूजेचे महत्त्व आणि दक्षिणा दिलेली आहे. |