वाडा महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा नोंद
ठाणे, १० सप्टेंबर (वार्ता.) – भिवंडी येथील वाडा महामार्गावर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरून जातांना तोल जाऊन पडल्याने आकाश जाधव (वय २२ वर्षे) या तरुणाचा ३१ ॲागस्टला अपघात होऊन मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो. त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गणेशपुरी पोलिसांनी रस्त्याचे काम करणारा ठेकेदार ‘मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन रोड बिल्डर्स प्रा.लि.’ या आस्थापनावर गुन्हा नोंद केला आहे. (आणखी किती लोकांचे जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार आहे ? अशा ठेकेदारांना काळ्या सूचीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)