पुणे येथील वाकड-बालेवाडी पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी जनहित याचिका प्रविष्ट !
५ वर्षांपूर्वी पुलाचे बांधकाम; स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास !
पुणे – वाकड-बालेवाडी येथील ५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. त्यामुळे भागातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निष्क्रीयतेच्या विरोधात अभिजित गरड आणि संदीप मंडलोई यांनी मुंबई उच्च न्यायालयात पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी जनहित याचिका प्रविष्ट केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी वर्ष २०१३ मध्ये या पुलाला संमती दिली होती. ३१ कोटी रुपये व्यय करून वर्ष २०१८-१९ मध्ये पूल बांधून पूर्ण झाला आहे; मात्र त्यानंतरही हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही.
संपादकीय भूमिकाअशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? प्रशासन स्वतःहून लक्ष का घालत नाही ? प्रशासनाला जनतेची काळजी नाही, असे म्हणायचे का ? |