प्रयागराज येथील शिवमंदिरातून शिवलिंगाचीच चोरी !
हिंदूची असुरक्षित मंदिरे !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील अतरसुइया भागातील पर्वत मोहल्ल्यामध्ये शिवमंदिरातून शिवलिंगाचीच चोरी करण्यात आली. सकाळी भाविक पूजा करण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
कौशांबी के बाद प्रयागराज में मंदिर से शिवलिंग चोरी #UttarPradesh #Prayagraj @PankajAajTak https://t.co/vgJYI54Z8x
— AajTak (@aajtak) September 10, 2023
स्थानिक हिंदूंचे म्हणणे आहे की, दारूड्यांनी हे शिवलिंग चोरले असावे. शिवलिंगासमवेत तांब्याच्या धातूचा नागही होता. तोही चोरण्यात आला.