बिहारचे शिक्षणमंत्री आणि राजदचे नेते चंद्रशेखर यादव यांनी महंमद पैगंबर यांना म्हटले ‘मर्यादा पुरुषोत्तम’ !
भाजपकडून टीका
नालंदा (बिहार) – बिहारचे शिक्षणमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर यादव यांनी येथील हिलसा भागात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या कार्यक्रमात बोलतांना महंमद पैगंबर यांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हटले. (हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये हिंदूंच्या देवतेला दिलेली धार्मिक उपाधी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांना देणारे यादव ! अशांना हिंदूंनी खडसावणे आवश्यक ! – संपादक) या विधानावरून भाजपने यादव यांच्यावर टीका करत ‘यादव मुसलमानांच्या लांगूलचालनाचा प्रयत्न करत आहेत’, असे म्हटले आहे. चंद्रशेखर यादव यांनी यापूर्वी श्रीरामचरितमानस यावरही टीका केली होती.
“मोहम्मद साहब मर्यादा पुरुषोत्तम थे”
◆ RJD के विधायक और बिहार के शिक्षा मंत्री प्रो. चंद्रशेखर का विवादित बयान
Chandrasekhar | #Chandrasekhar | #RJD pic.twitter.com/whSEMcKV10
— News24 (@news24tvchannel) September 9, 2023
चंद्रशेखर यादव यांनी म्हटले की, जेव्हा जगामध्ये सैतानी वृत्ती आणि अप्रमाणिकता वाढली, तेव्हा आशियामध्ये ईश्वराने, प्रभूने, परामात्म्याने जगात प्रमाणिकता निर्माण करण्यासाठी मर्यादा पुरुषोत्तम प्रेषित महंमद पैगंबर यांच्या रूपात जन्म घेतला. इस्लाम प्रामाणिक लोकांसाठीच स्थापन झाला आहे. इस्लाम सैतान आणि अप्रमाणिकता यांच्या विरोधासाठी आला आहे; मात्र अप्रामाणिक लोकही स्वतःला मुसलमान समजातात, तेव्हा अल्ला त्याला अनुमती देत नाही.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यादव यांच्यावर कारवाई करावी ! – दानिश इक्बाल, भाजप
बिहारमधील भाजपचे प्रसारमाध्यम शाखेचे प्रमुख दानिश इक्बाल यांनी म्हटले की, चंद्रशेखर यांचे विधान लांगूलचालनाची परिसीमा आहे. यादव यांनी पूर्वी एका धर्मग्रंथाचा अवमान केला आहे. राष्ट्रीय जनता दलाची ही परंपरा झाली आहे. समाजामध्ये फूट पाडण्याची राजकारण केले जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अशा मंत्र्यावर कारवाई केली पाहिजे.
संपादकीय भूमिकाया जगात ‘मर्यादा पुरुषोत्तम’ केवळ एकच आहेत आणि ते म्हणजे भगवान श्रीराम ! अशा वेळी अन्य कुणाला ही उपमा देणे चुकीचे आहे. मुसलमानांच्या मतांसाठी अशी विधाने करणार्यांचा वैध मार्गाने विरोध झाला पाहिजे ! |