मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समाविष्ट करू नये !
भारतीय ओ.बी.सी. शोषित संघटनेची मागणी
सावंतवाडी – मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; परंतु त्यांना इतर मागास प्रवर्गात (ओ.बी.सी.) समाविष्ट करू नये. ओ.बी.सी. आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची दक्षता शासनाने घ्यावी. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी असतांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी. प्रवर्गात घुसवण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाले, तर पुढे होणार्या परिणामांना सरकार उत्तरदायी राहील, अशी चेतावणी ओ.बी.सी. शोषित संघटनेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने एका निवेदनाद्वारे शासनाला देण्यात आली आहे. याविषयीचे शासनाला द्यावयाचे निवेदन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे अध्यक्ष आनंद नारायण मेस्त्री, उपाध्यक्ष रमण वायंगणकर, कुंभार समाजाचे माजी अध्यक्ष अिधवक्ता गणपत शिरोडकर, रावजी यादव, चंद्रकांत कुंभार, सुनील पाटकर, चंद्रशेखर माळवे आणि लक्ष्मण तेली उपस्थित होते.