ख्रिस्ती धर्मगुरूंनी अन्य धर्मियांच्या भावना दुखावू नयेत ! – गोव्याचे आर्चबिशप
|
पणजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) – चिखली, वास्को येथील चर्चचे पाद्री बॉलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नुकतेच ताळगाव येथील एका चर्चमध्ये एका पाद्रयाने प्रार्थनेच्या वेळी हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमात प्रसारित झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ८ सप्टेंबर या दिवशी या विधानाची गंभीर नोंद घेऊन यापुढे धार्मिक भावना दुखावल्यास कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. (यापुढे कराच; पण आताही कारवाई व्हायला हवी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक)
Goa Archbishop regrets remarks by Church members on other religion #Archbishop #Church #Heritage #Panaji #Regrets https://t.co/D51rZEHHFV
— TeluguStop.com (@telugustop) September 9, 2023
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर नोंद घेतल्यानंतर २४ घंट्यांच्या आत गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून अशा घटनांविषयी चर्चची भूमिका स्पष्ट केली आहे.
HURTING RELIGIOUS SENTIMENTS: CM WARNS ACTION pic.twitter.com/etnCC38MSR
— Prudent Media (@prudentgoa) September 8, 2023
चर्चमध्ये प्रार्थनेच्या वेळी हिंदु देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केलेल्या पाद्रयाला समज दिल्याचे आर्चबिशप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. पत्रकात आर्चबिशप म्हणतात, ‘‘आम्हाला मनापासून खेद वाटतो की, अलीकडच्या काळात चर्चच्या काही सदस्यांनी आंतरधर्मीय संवाद आणि परस्पर आदराची भावना यांविरोधात विधाने केली आहेत. आम्ही सर्वांना निश्चिती देऊ इच्छितो की, चर्चच्या नेतृत्वाने त्यांच्यासंदर्भात योग्य ती कारवाई केली आहे आणि भविष्यात अशी विधाने करण्यापासून टाळण्याची कडक चेतावणी दिली आहे. ख्रिस्ती समुदायाने इतरांच्या धार्मिक भावना दुखावणारी विधाने करू नयेत आणि चर्चच्या शिकवणीचे पालन करावे. ही माहिती ‘व्हॅटीकन-२’ घोषणामध्ये (२८ ऑक्टोबर १९६५) देण्यात आलेली आहे. पोप फ्रान्सिस यांनी धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्याची शिकवण दिलेली आहे आणि धर्माचा वापर द्वेष, हिंसा, कट्टरता यांच्यासाठी करण्याची दक्षता घेण्याचे आवाहन केलेले आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ हे आमच्या आचार आणि विचार यांमध्ये दडलेले आहे.’’
Another controversy after Fr During Sermon passes remarks on Hindu gods. CM Sawant warns of action
(सौजन्य : In Goa 24×7)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहेत. – संपादक)
संपादकीय भूमिकाआर्चबिशप यांनी अशी समज पाद्रयांना आधीच दिली असती, तर आज ही वेळ आली नसती ! |