‘जी-२०’ परिषदेविषयी चीनकडून भारताची स्तुती : अमेरिकेवर टीका !
बीजिंग – ‘जी-२०’ शिखर परिषदेच्या आयोजनावरून चीनने भारताची स्तुती केली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या परिषदेस उपस्थित राहिले नाहीत.
‘जी-२०’ विषयी चीन सरकारचे अधिकृत प्रसारमाध्यम असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने त्यांच्या लेखात म्हटले आहे, ‘‘भारताच्या पाठीशी उभे रहाण्याचा दावा करणारी अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी ‘जी-२०’ देशांमधील मतभेद चव्हाट्यावर आणले आहेत. त्यांना त्यांचे धोरण पुढे रेटायचे आहे. भारत आर्थिक सुधारणा आणि बहुपक्षीय मुत्सद्देगिरी यांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो; परंतु अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांना हे नको आहे. हे देश रशिया-युक्रेन युद्धाला अधिक महत्त्व देत आहेत. पाश्चात्त्य देशांनी सतत भारत-चीन संघर्षाला खतपाणी घातले आहे.’’