एस्.टी. कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये ४ टक्के वाढ !
मुंबई – राज्यशासनाने एस्.टी. कर्मचार्यांचा महागाई भत्ता ३४ वरून ३८ टक्के केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ सप्टेंबर या दिवशी याला मान्यता दिली. यासाठी ९ कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भत्त्यामध्ये झालेली वाढ यामुळे एस्.टी. कर्मचारी आनंदित झाले आहेत. आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे एस्.टी. महामंडळाच्या कर्मचार्यांच्या वेतनासाठी सरकारला आर्थिक साहाय्य द्यावे लागत आहे.