शुल्‍कातील घसरणीमुळे शेतकर्‍यांनी रस्‍त्‍यावर टोमॅटो फेकले !

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील घटना !

शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्‍त्‍यावर ओतून लाल चिखल केला

नाशिक – राज्‍यातील टोमॅटोच्‍या शुल्‍कात मोठी घसरण झाली आहे. २०० रुपये किलोने विक्री होणारे टोमॅटो सध्‍या २ रुपये किलोवर आले आहेत. त्‍यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील जाधव मंडीमध्‍ये टोमॅटोला भाव मिळत नसल्‍याने येथील शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्‍त्‍यावर ओतून लाल
चिखल केला आहे. शुल्‍क घसरल्‍यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून त्‍यांनी सरकारचा निषेध केला.

वांग्‍यांच्‍या शुल्‍कातही मोठी घट झाली आहे. त्‍यामुळे टोमॅटोसमवेत शेतकर्‍यांनी वांगीही रस्‍त्‍यावर फेकून दिली. नाशिक येथे पिंपळगाव बाजार समितीमध्‍ये टोमॅटो फेकून शेतकर्‍यांनी संताप व्‍यक्‍त केला. (टोमॅटो आणि वांगी फेकून त्‍याचे शुल्‍क वाढणार आहे का ? अधिक झालेले उत्‍पादन
रस्‍त्‍यावर टाकून देण्‍याऐवजी ते विनामूल्‍य उपाहारगृहे, आश्रमशाळा, वसतीगृहे किंवा जनावरांना दिले, तर अधिक चांगले होईल. याचे पुण्‍य तरी शेतकर्‍यांना मिळेल. – संपादक)